Share

अभिनेत्रीच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Published On: 

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी अनेक मालिकेत काम केले आहे. सध्या पाहिले न मी तुला या मालिकेत उषा मावशीच्या भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या देखील प्रचंड पसंतीस पडली. नुकतेच वर्षा दांदळे यांनी आपल्या अपघाताचे वृत्त इन्स्टाग्रामवर शेअर केले. याची माहिती सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाली. याची दखल घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिकला पाठवले. वर्षा दांदळे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका देखील आहेत.

वर्षा यांना या अपघातात त्यांच्या मणक्याला आणि उजव्या पायला देखील मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना हालचाल करणेही शक्य नाही. हे पाहून त्यांच्या चाहता वर्गाने देखील त्यांच्यासाठी प्रार्थना केली. किशोरी पेडणेकर यांनी नाशिकला जाऊन वर्षा दांदळे यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि नव्या उमेदीने पुन्हा कला क्षेत्र सक्रिय होणार अशा शुभेच्छा दिल्या आहेत. आपली दखल घेतली असल्याने वर्षा ताईंनी मुख्यमंत्री आणि किशोरी पेडणेकर यांचे आभार मानले आहेत.

https://www.instagram.com/p/CVO4iSvqLFs/?utm_source=ig_web_copy_link

वर्षा दांदळे यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत म्हटले की, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या अपघाताची बातमी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समजताच त्यांनी वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिक येथे जाऊन त्यांची भेट घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांची नाशिक येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली तसेच तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.

तसेच पुन्हा आपण चित्रपट क्षेत्रात नव्या उत्साहाने, उमेदीने काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, अशा शुभेच्छा दिल्या. यासोबतच आजारातून लवकर बरे होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली. याप्रसंगी नगरसेविका सिंधू मसुरकर उपस्थित होत्या. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद महापौर मॅडम, कलाकाराला तुमच्या राज्यात मान आहे प्रेम आहे शतशः प्रणाम.” अशी एक पोस्ट शेअर करत त्यांनी मुख्यमंत्री आणि महापौर किशोरी पेडणेकर यांचे आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!