Share

Manipur Election 2022 : भाजपने मणिपुरमध्ये १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण केले- अमित शहा

Published On: 

मणिपूर: मणिपूर विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून, आता दुसऱ्या टप्प्यासाठी ५ मार्चला मतदान होणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मणिपूर येथे प्रचार सभेदरम्यान भाजप सरकारने मणिपुरमध्ये १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण केले असल्याचे म्हटले आहे.

“पूर्वी वीज सेवा खूप अनियमित होती आणि फक्त तासभर चालत असे. मात्र आम्ही मणिपूरचे १००% विद्युतीकरण पूर्ण केले आहे. (100% Electrification in Manipur) आणि आता प्रत्येक गावात २४ तास वीज पोहोचत आहे.”, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

तसेच यापूर्वीच्या सरकारच्या काळात मणिपूरमध्ये फक्त ५% घरांमध्ये थेट शुद्ध पिण्याच्या पाण्याची जोडणी होती. मात्र
आमच्या सरकारच्या अंतर्गत मणिपूरमधील ९५ % घरांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची जोडणी आहे. असेही अमित शहा यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण मणिपूरमधील १.५५ लाख मातांना मोफत गॅस सिलिंडर दिले आहेत. असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!