🕒 1 min read
नवी दिल्ली: मणिपूर विधानसभा निवडणुकीचा (Manipur Election 2022) पहिला टप्पा पार पडला असून, आता दुसऱ्या टप्प्यासाठी ५ मार्चला मतदान होणार आहे. तत्पूर्वी आज (१ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Criticism of Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मणिपूरच्या मतदारांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
काँग्रेस पक्ष राज्याची लूट करण्यात इतका गुंतला आहे, की त्यांना लोकांसाठी काम करायला वेळच नाही. मणिपूरच्या विकासासाठी काँग्रेसने काहीही केले नाही, मात्र भाजप मणिपूरच्या विकासासाठी कायम तत्पर आहे. असा टोलाही मोदींनी लगावला आहे.
तसेच काँग्रेसची ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती भाजप उद्ध्वस्त करेल असेही मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान मणिपूरमध्ये क्रिडा विकासासाठी आम्ही राज्यात क्रीडा विद्यापीठही उभारणार असून मणिपूरची ओळख आता कौशल्य, स्टार्टअप आणि खेळ यातून होत आहे. भविष्यात आमचे सरकार १०० कोटी रुपयांचा स्टार्ट-अप फंड तयार करण्यास तयार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- दीपा करमरकर धक्कादायक रित्या कारण न सांगताच FID कडून सस्पेंड
- ‘वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा चित्रपटसारखी संजय राऊतांची अवस्था’ – आशिष शेलार
- पंतप्रधान कार्यालयाला पुरावे सोपवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
- संभाजी भिडेंचे वादग्रत वक्तव्य; म्हणाले,‘डॉक्टर XXXच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका’
- “भाजपवर केलेले आरोप आम्ही खोडुन काढु”, दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
