🕒 1 min read
Sheetal Sheth | मुंबई : युवासेना कोअर कमिटीचे सक्रिय सदस्य शीतल शेठ (Sheetal Sheth) यांनी राज्य सरकार (Shinde-Fadanvis Govt) अर्थात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारवर निशाणा साधला आहे. टाटा एअर बस प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. याच स्पष्टीकरणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पुरावे सादर करत फेटाळलं आहे.
शीतल शेठ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचे पुरावे आहेत. यावेळी देववेंद्र फडणवीस यांनी टाटा एअर बसचे प्रमुखांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासारखं वातावरण नसल्याचं कारण दिलं असून प्रमुखांचं नाव गुपीत ठेवणं गरजेचं आहे, असं म्हटलं आहे.
यावर प्रत्युत्तर देत, आमची भेट झाली तेव्हा केंद्र सरकार जी जागा सांगेल तिथेच गुंतुवणूक करावी लागेल असं या प्रकल्पांच्या प्रमुखांनी सांगितलं, असल्याचा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रमुखाचं नाव सांगण्याचं आव्हान दिलं आहे.
पाहा ट्विट –
असत्याचा पर्दाफाश १@Dev_Fadnavis जी, यांचा फ़ॉर्म्युला खोटं बोला रेटुन बोला ! #खोकेसरकार_खोटेसरकार @ShivSena @ShivsenaComms @BJP4Mumbai pic.twitter.com/dJX53GQFdU
— Sheetal Swapnil Sheth (@SheetalSheth_) November 2, 2022
दरम्यान, शीतल शेठ यांनी याबाबत ट्विट केलं असून असत्याचा पर्दाफाश १, देवेंद्र फडणवीस यांचा यांचा फ़ॉर्म्युला खोटं बोला रेटुन बोला!, असा असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच व्हिडीओच्या शेवट खोके सरकार खोटे सरकार, असा देखील टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Raees Shaikh । “इक्बाल चहल यांना आयुक्तपदावरून हटवा”; रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! संपादकांना जबाबदर ठरवण्याची कोणालाही परवानगी नाही
- Uddhav Thackeray | “मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचवा”; उद्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा
- Uddhav Thackeray | रुपयातील ८० पैसे गुजरातला जातात, मग गुजरातला…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Raju Shetti | “सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही तर… “; राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
