Share

Uddhav Thackeray | “मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचवा”; उद्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा

Published On: 

🕒 1 min read

 Uddhav Thackeray | मुंबई : एकानाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यामध्ये भाजप (BJP) पक्षासोबत युती करत सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट झाले असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच महाराष्ट्रातून एकापाठोपाठ प्रकल्प बाहेर जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामना (Saamana) अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)

महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील घाव आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीचे अपहरण हे रष्ट्रीय अस्मितेचे वस्त्रहरण आहे. पण आपले मिंधे मुख्यमंत्री निर्विकारपणे सांगतात. ‘भाजप सोबत आल्याने मी आज समाधानी आहे’ छान! महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे सेनापती बापट का सांगून गेले ते आता स्पष्ट झाले. मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचवा, असं म्हणत ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील; पण इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’या मोदी यांच्या घोषणेतील फोलपणा समोर येतो. रुपयातील 80 पैसे गुजरातला व 20 पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही? तेही करा. कारण आजही गुजरातच्या पलीकडे सध्याच्या दिल्लीश्वरांची झेप जात नाही.

सामना अग्रलेखात असंही म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे व महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारखा महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. साधारण दीड लाख कोटींची गुंतवणूक राज्यात होणार होती. व एक लाखावर लोकांना रोजगार मिळण्याची खात्री होती. हा प्रकल्प केंद्राने गुजरातकडे खेचून नेला. त्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत नाही तोच टाटा एअरबस हा बावीस हजार कोटींचा प्रकल्प किडनॅप करून गुजरातेत नेल्याने महाराष्ट्रावर मोठाच आघात झाला आहे. प्रकल्प ठरवून मोदी-शहा यांच्या गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत, व त्या किडनॅपिंगवर राज्याचे मिंधे मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!