औरंगाबाद : घरासमोर फिरणाऱ्या महिलेला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला महिलेने चांगलीच अद्दल घडवली. अश्लील चाळे करत असलेल्या तरुणाला न घाबरता महिलेने धाडस करुन त्या तरुणाच्या दुचाकीची चावी काढून घेतली. यामुळे त्या तरुणाने महिलेवर हात उगारला असता तिने आरडाआोरड केला असता जमावाने त्याला बेदम चोप दिला.
सातारा परिसरात राहणारी ३४ वर्षीय महिला स्वत: चा व्यवसाय करते. नेहमीप्रमाणे ती मंगळवारी संध्याकाळी काम आवरुन घरासमोर पायी चालत होती. इतक्यात रांजणगाव येथील एक तरुण दुचाकीवर समोर जाऊन परत आला. काही अंतरावर त्याने दुचाकी उभी करुन अश्लील चाळे सुरु केले. या घटनेने महिला घाबरली पण पळुन गेलो तर त्याची हिम्मत अजून वाढेल या भितीने त्यांनी धाडस केले आणि त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. तरुणाने आपली चावी परत मिळवण्यासाठी महिलेवर हात उगारला.
महिलेने मोठ्या धाडसाने त्याच्या तावडीतुन स्वत: ची सुटका केली आणि स्वत: च्या घराच्या दिशेने धावत आरडाओरड सुरु केला. दरम्यान तो तरुण पळुन जाण्याचा प्रयत्न करत होता. पण महिलेने आरडाओरड केल्यमुळे तिच्या कुटूंबाने व परिसरातील नागरीकांनी त्याला चांगलेच बदडले आणि नंतर सातारा पोलिसांच्या हवाली केले. सदर आरोपीविरुद्ध पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक अनिता फसाटे यांनी एका दिवसात पुरावे, साक्षीदार गोळा करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले. त्यावर न्यायालयाने अनिल तुपे याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीचा रंग बदलणार नाही’, तेंडुलकरचे महत्त्वपुर्ण वक्तव्य
- आखेर नायगाव येथील दारुबंदीला मिळाला हिरवा कंदिल
- 45 वर्षांवरील नागरिकांना 1 मार्चपासून लस मिळवण्यासाठी करावं लागेल ‘हे’ काम
- मराठा आरक्षणाचा लढा तीव्र; ७ मार्च रोजी राज्यस्तरीय आक्रोश मोर्चाची तयारी सुरू
- लातूर पोलिसांकडून बुलेटचा आवाज चिरडला; धडक कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
