Share

लातूर पोलिसांकडून बुलेटचा आवाज चिरडला; धडक कारवाई

Published On: 

🕒 1 min read

लातूर : जिल्हातील दुचाकीद्वारे होणाऱ्या ध्वनीप्रदुषणावर लातूर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांचा आवाज चिरडला आहे. कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून त्यावरुन बूलडोजर लातूर पोलीसांनी फिरवला आहे. शहरातील विमानतळाच्या परिसरातील मोकळ्या जागेत ही कारवाई पोलिसांनी केली आहे.

विचित्र व कर्णकर्कश हॉर्न असणाऱ्या दुचाकीची क्रेझ तरुणाईत दिसते. त्यातल्या त्यात बुलेटच्या हॉर्नचा आवाज चांगल्यचांगल्याचे लक्ष वेधुन घेतो. ज्याभागात ध्वनी प्रदूषणाला बंदी आहे, अशा भागातूनही कर्णकर्कश हॉर्न वाजवत दुचाकीस्वार फिरत असतात. आरटीओकडूनही अशा वाहनांवर कारवाई केल्या जात नाही. शहरातील युवा वर्ग दुचाकी चालवताना मोठ्या प्रमाणात हॉर्न वाजवत ध्वनी प्रदूषण करत असतात. अशी वाहने पोलिसांजवळून गेली तरी पोलिस प्रशासन दुर्लक्ष करतात अशी नागरिकांची तक्रार होती.

मात्र पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत वाहतूकीचे नियम वाऱ्यावर सोडणाऱ्या वेगाने धावणाऱ्या या दुचाकीस्वारावर धडक कारवाई करत अशा दुचाकीचे हॉर्न व सायलन्सर काढुन घेतले. आणि चक्क त्यावर बुलडोझर फिरवीला. शहराजवळील विमानतळ परीसरात असलेल्या मोकळ्या जागेवर तब्बल ३२५ वस्तुंची रांग लावून त्यावर बुलडोझर फिरवीला. यात २५६ बुलेट च्या सायलन्सरचा समावेश होता. पोलिस निरीक्षक शंकरराव पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!