🕒 1 min read
जालना : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या ३५ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आता आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून ७ मार्च रोजी राज्यस्तरीय आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी साष्टपिंपळगाव येथे येऊन आंदोलकांची भेट घेतली होती. मात्र त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता.
राष्टपिंपळगावातील आंदोलनाला राज्यभरातील विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील गावागावांमध्ये उपोषणे केली जात आहेत. अंबड तालुक्यातही प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर देखील मराठा आरक्षणासाठी आंदोलने करण्यात आली.
दरम्यान, आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून राष्टपिंपळगाव येथे ७ मार्च रोजी राज्यस्तरीय आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. मराठा समाजाने आपल्या व मुलांच्या भविष्यासाठी आरक्षणाच्या या लढाईत एकजूट दाखवण्याचे आवाहन साष्टपिंपळगावातील आंदोलकांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुलांनाे, आई-बाबांनी बाहेर जाताना मास्क घातला की नाही ते पाहा; आरोग्य मंत्र्यांचे शाळकरी मुलांना पत्र
- भीषण अपघातात सुधीर मुनगंटीवार यांचे चुलत बहीण-भाऊजी ठार
- पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
