🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा उसळी घेत आहे.
दरम्यान, सरकारने बुधवारी असा निर्णय घेतला की, 60 वर्षांपेक्षा जास्त वय किंवा अन्य आजाराने ग्रस्त असणाऱ्या 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना 1 मार्चपासून कोरोना लस मोफत दिली जाईल. तर खाजगी केंद्रांवर लस घेतल्यास त्यांना शुल्क द्यावे लागेल. मात्र गंभीर आजाराने ग्रस्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना यासाठी स्वाक्षरीकृत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असेल, ज्यात त्यांच्या आजाराचे तपशील असतील. बुधवारी सूत्रांनी याबाबत माहिती दिली.
लसीकरण केंद्रावर फॉर्म आणावा लागेल
सूत्रांच्या माहितीनुसार जे लोकं यापैकी कोणत्याही श्रेणीमध्ये येत असतील तर त्यांना त्यांच्या मेडिकल कंडिशनबाबत एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यावर त्यांच्या डॉक्टरांची सही देखील घ्यावी लागेल. व्हॅक्सिनेशन सेंटरवर लस घेताना त्यांना हा फॉर्म आणावा लागेल. दरम्यान खाजगी लसीकरण केंद्रावर कोव्हिड व्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत 300 रुपयांपर्यंत असू शकते. तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी व्हॅक्सिनेशन सेंटर्सवर ही लस मोफत दिली जाईल.
केंद्र सरकारने याआधी अशी माहिती दिली होती की, लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी कोव्हिन अॅपचा वापर केला जाईल आणि त्याअंतर्गतच त्यांना जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती दिली जाईल. मात्र सध्या हे app केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सच वापरू शकत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शहरांची नावं बदलता बदलता भाजपच्या मुख्यमंत्र्यांने चक्क फळाचे देखील नाव बदलले
- पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
