Share

‘नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीचा रंग बदलणार नाही’, तेंडुलकरचे महत्त्वपुर्ण वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना आज (दि. २४ फेब्रुवारी) आहे. या कसोटीचे दोन खास वैशिष्ट्ये आहेत. हा डे-नाईट कसोटी सामना असून गुलाबी चेंडूने खलवण्यात येईल. दुसरं म्हणजे सामन्याचे आयोजन जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी (मोटेरा) स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या स्टेडियममध्ये हा पहिलाच सामना खेळवला जात आहे. तत्पुर्वी चेन्नईत झालेल्या पहिल्या २ कसोटी सामन्यात खेळपट्टीमुळे बराच विवाद निर्माण झाला होता. परंतु अहमदाबाद स्टेडियमची खेळपट्टी चांगली असल्याचा दावा माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने केला आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे सचिनने यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘अहमदाबाद स्टेडियम साबरमती नदीच्या जवळ आहे. त्यामुळे या स्टेडियमच्या खेळपट्टीमध्ये ओलावा असेल. परिणामत: पूर्ण ५ दिवसही खेळपट्टीचा रंग बदलणार नाही. यामुळे तुम्ही चकित होऊ नका,’ असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.

साधारणपणे कसोटी सामन्यात विशेष करुन भारतात प्रत्येक दिवशी खेळपट्टी रंग बदलते. खेळपट्टीत भेगा पडतात. मात्र सचिनच्या म्हणण्यानुसार अहमदाबाद स्टेडियम साबरमती नदीच्या नजीक असल्याने खेळपट्टीमध्ये ओलावा असेल. त्यामुळेच सामन्याचे पाचही दिवस खेळपट्टीचा रंग एकच असेल. या खेळपट्टीतील ओलाव्यामुळे संध्याकाळी वेगवान गोलंदाजांना याचा फायदा होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!