Share

IPL 2022 RR vs KKR : संघाच्या पराभवानंतर शाहरुख खाननं केलं ट्वीट; म्हणाला, “तुम्ही सगळे…”

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा (RR vs KKR) ७ धावांनी पराभव केला. एकावेळी या सामन्यात कोलकाताचा विजय जवळपास निश्चित वाटत होता. शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी ११ धावांची गरज होती आणि २ विकेट शिल्लक होत्या. राजस्थानकडून वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयने कोलकात्याच्या उर्वरित दोन्ही विकेट्स ३ चेंडूंत घेत सामना संपवला. या पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी केकेआरचा सहमालक शाहरुख खान (shahrukh khan) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे.

शाहरुख खानने त्याच्या ट्विटर हँडलवरून म्हटले, ”तुम्ही सगळे चांगले खेळलात. श्रेयस अय्यर, आरोन फिंच आणि उमेश यादव यांचे उत्तम प्रयत्न. सुनील नरिनचे १५०व्या सामन्यासाठी आणि १५ वर्षांपूर्वी खेळलेल्या त्या अप्रतिम खेळीबद्दल ब्रेंडन मॅक्युलमचे अभिनंदन. मला माहीत आहे, की आपण हरलो आहोत पण जर आपल्याला हरवायचे असेल तर हा योग्य मार्ग आहे. आत्मविश्वास बाळगा.”

शाहरुखच्या हे ट्वीट कोलकाता नाइट रायडर्सने हार्ट इमोजीसह रिट्वीट केले. १८ एप्रिल २००८ रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात मॅक्क्युलमने कोलकाताकडून खेळताना संस्मरणीय शतक झळकावले. केकेआरने या हंगामात आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत ज्यात त्यांनी ३ विजय मिळवले आहेत. सहा गुणांसह, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघ १० संघांच्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात श्रेयसने ५१ चेंडूत ८५ धावा केल्या, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!