Share

“अमरावती दंगलीमागचा मास्टरमाईंड यशोमती ठाकूर” ; भाजप नेते अनिल बोंडेंचा खळबळजनक आरोप

Published On: 

अमरावती : अमरावती येथे झालेल्या दंगली संदर्भात भाजप नेते व आमदार अनिल बोंडे यांनी खळबळजनक विधान केले आहे. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी अमरावतीत काही पक्षांनी बंद पुकारला होता. या अमरावती बंदला हिंसक वळण मिळाले होते. या दरम्यान दोन गटांमध्ये दंगल उसळली होती. आत या अमरावती दंगली संदर्भात अनिल बोंडे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. “अमरावती दंगलीमागे मंत्री यशोमती ठाकूर या मास्टरमाईंड आहेत,” असा गंभीर आरोप अनिल बोंडे यांनी केला.

अनिल बोंडे म्हणाले, “दुर्दैव आहे की, अमरावती दंगलीमागे मास्टर माईंड अभय महात्मे असल्याच्या बातम्या मीडियासुद्धा देत आहे. अभय महात्मे मास्टर माईंड नाहीये. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर दंगलीमागच्या मास्टर माईंड आहेत.”

यावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे यांच्यावर पलटवार केला आहे. “अनिल बोंडे हे फस्ट्रेशनच्या फेजमधून जात आहेत. विक्षिप्तपणाने कधीपण भडकवण्याची भाषा करत असतात. त्यांना अमरावतीचं वातावरण अस्वस्थ करायचं आहे. या प्रकरणी पोलिस तपास यामध्ये सुरु आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. देशात अस्वस्थता निर्माण करण्याचं काम भाजपवाले करत आहेत. तोच एक प्रकार म्हणजे बोंडे आहेत.” असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!