नागपूर : भोंग्यांच्या विषयावरून सध्या राजकारण चांगलेच तापले असताना पाहायला मिळत आहे. आता भोंग्यांच्या विषयाला रामदास आठवलेंनी सुद्धा उडी घेतली आहे. रामदास आठवले नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले, एका बाजूला भोंगे आहेत, तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंगे लावायचे तर लावा आमचा काही विरोध नाही. पण मंदिरात भोंगे लावताना दोन धर्मात तणाव निर्माण करू नये, भारतातील मुस्लिम पूर्वी हिंदू होते, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
रामदास आठवले म्हणाले, “राज ठाकरे यांनी अनेक वेळा भूमिका बदलली आहे. त्यांच्या झेंड्यांचा रंग बदलला आहे. राज्य सरकारने सांगितले परवानगी घेवून भोंगे लावावे. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. पण, आपल्या देशात लोकशाही आहे. आपल्या देशात पेशवाई नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. तुम्हाला भोंगे लावायचे असतील तर लावा. प्रत्येक पक्षाची मुस्लिम विंग आहे. त्यामुळे भोंगे काढायला लावणे बरं नव्हे. भारतातील मुस्लिम पूर्वी हिंदू होते. त्यामुळे एक दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करावा. २०२४ मध्ये केंद्रात आमचंच सरकार येईल.”
राज्य सरकार पडावे असं मला वाटतं, पण सध्या सरकार पडण्यासारखी स्थिती नाही. सरकार पडले तर सरकार बनवण्याची आमची तयारी आहे. सरकार पडले तर विश्वास प्रस्तावाच्या वेळेस बरेच आमदार अनुपस्थिती राहणार. आम्ही विश्वास प्रस्ताव जिंकू. आता कुणा आमदाराला निवडणूक नको. कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेचे आमदार नाराज आहेत. विश्वास प्रस्तावाच्या वेळेस शिवसेनेचे आमदार गैरहजर राहतील. बऱ्याच सेना आमदारांना भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे”, असेही रामदास आठवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

