मुंबई : आयपीएल (IPL) मध्ये खेळाडूंमध्ये बाचाबाची झालेली आपण कित्येक वेळा पाहिली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानावरील त्याच्या आक्रमक वृत्तीसाठी ओळखला जातो. मैदानावर खेळाडूंना अनेकदा विराटच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल २०२०च्या एका सामन्यादरम्यान मैदानावर विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्यातही असाच काहीसा प्रकार झाला होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यावेळी नक्की काय झाले होते, याचा खुलासा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या शोमध्ये केला आहे.
सूर्यकुमार म्हणाला, ”विराट कोहलीची स्वतःची शैली आहे, त्याच्याकडे असलेली ऊर्जा वेगळ्याच पातळीची आहे. तो सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा होता, त्यामुळे त्या सामन्यात त्याची स्लेजिंग वेगळ्या पातळीवर होती. पण मी स्वतःवर लक्ष केंद्रित केले होते. काहीही होऊदे बॉस, लक्ष दुसरीकडे वळवायचे नाही, असे मी ठरवले होते.”
https://twitter.com/IamKritika__/status/1516357446524338178
”मला आठवते, की मी त्या वेळी च्युइंगम चघळत होतो आणि तो माझ्या दिशेने चालत आला. आतून माझी फाटली होती, माझे हृदय धडधडत होते. तो काही बोलत नव्हता, मी काही बोलत नव्हतो. मी स्वत:ला सांगत होतो, की ‘काहीही झाले तरी एक शब्दही बोलू नकोस. ही १० सेकंदांची बाब आहे. त्यानंतर नवीन षटक सुरू होईल. परिस्थिती निघून गेली आणि मग मी त्याला सामन्यानंतरच पाहिले”, असे सू्र्यकुमारने सांगितले.
आयपीएल २०२० सूर्यकुमार यादवसाठी चांगले ठरले. त्याने चार अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्ससाठी ४८० धावा केल्या. मुंबईने त्यावेळी विक्रमी पाचवे आयपीएल विजेतेपदही पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

