Share

समीर वानखेडेंचा जुना फोटो शेअर करत नवाब मलिक म्हणाले, ‘पहचान कौन?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. एनसीबीने मात्र आरोप फेटाळले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीटरला एक फोटो शेअर केला आहे.

मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केला असून फोरोसोबत पेहचान कौन? असे कॅप्शनही त्यांनी दिले आहे. दरम्यान हा फोटो समीर यांच्या पहिल्या लग्नातील असल्याचा असून त्याने पहिले लग्न डॉ शबाना कुरेशी यांच्याशी झाल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता समीर यांच्या पहिल्या लग्नासंबंधी चर्चांना उधाण आले आहे.

https://twitter.com/WarNishant/status/1452491341317869568?s=20

दरम्यान, मलिक यांनी या सोबतच अजून एक ट्वीट केले असून यामध्ये समीर वानखेडेंशी संबंधित कागदपत्राचा फोटो शेअर केला आहे. तसेच वानखेडे यांचा सगळं घोटाळा इथूनच सुरु होत असल्याचेही ते म्हणाले आहेत. हा कागद नेमका कशासंबंधी आहे याचा उल्लेख त्यांनी केलेला नाही, तसेच हा फोटो अस्पष्ट असल्याने ते वाचता येणे कठीण आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!