मुंबई: अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं त्यांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितलं आहे. त्यांनी सोशल मिडियावर टाकलेली ती पोस्ट व्हायरल झाली होती मात्र नंतर त्यांनी ती पोस्ट डिलिट केल्याचे दिसत आहे. पोस्ट डिलिट जरी केली असली तरी मात्र आता यावरून चर्चेला उधाण आले आहे.
पुण्यात ब्राह्मण महासंघाने शरद पोंक्षे यांच्या ‘मी व नथुराम’ या पुस्तकाच्या ८ व्या आवृत्तीच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले होते. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्याच सोबत शरद पोंक्षे यांची राहण्याची सोय पुण्यातील एका हॉटेलमध्ये केली होती, मात्र त्या हॉटेलचे पैसे आनंद दवे यांनी भरले नाहीत, त्यामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागला असल्याचे शरद पोंक्षे म्हणाले आहेत.
ब्राह्मण संघातर्फे कार्यक्रम केला म्हणून मी हो म्हटले पण हा माणूस मला नेहमीच डँबीस आहे असा संशय होताच त्याने ते सिध्द केले. अखेर प्रकाशकांनी ते पैसे भरले. तेव्हा सर्वांनी दवे बरोबर कोणताही व्यवहार करू नये ही विनंती, सोबत त्याचा फोटो देत आहे. तसेच समस्त ब्राह्मण संघातील सभासदांनी सावध रहावे, अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली होती मात्र त्यांनी ती नंतर डिलिट केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मिलिंद नार्वेकरांचे ट्विट ठाकरे सरकारच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे’
- ‘अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग असेल’
- ‘तेव्हा माझे चेंडू ईडन पार्कच्या बाहेर पाठवले होते’, एजाज पटेल, वीरेंद्र सेहवागचे ट्विट चर्चेत
- बॉलीवूडमध्ये तब्बल २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्शद वारसी म्हणाला.. ‘मला धक्का बसला..’
- मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख ना?- नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

