Share

बॉलीवूडमध्ये तब्बल २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्शद वारसी म्हणाला.. ‘मला धक्का बसला..’

Published On: 

मुंबई : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ ( Munna Bhai MBBS) आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ (Lage Raho Munna Bhai) या चित्रपटानंतर अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) लोकप्रिय झाला. अर्शदने बॉलीवूडमध्ये नुकतेच तब्बल २५ वर्ष पूर्ण केली आहेत. मात्र २५ वर्षे पूर्ण केल्याचा आनंद आहेच त्यासोबत मला धक्काही बसला असे वक्तव्य त्याने नुकताच केला आहे.

दरम्यान अर्शदने नुकतंच एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यापासून ते चित्रपट कारकिर्दीबद्दल अनेक गोष्टींबाबत खुलासा केला. सिनेसृष्टीत २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अर्शद म्हणाला की, “मला अजूनही विश्वास बसत नाही की मी सिनेसृष्टीत इतकी वर्षे टिकू शकेन. मी २५ वर्षे पूर्ण केल्याचा मला आनंद आहे. पण त्यासोबत मला धक्काही बसला.” असे सांगितले. ‘मी २५ वर्षे सिनेसृष्टीत टिकेन असे मला अजिबात वाटले नव्हते. यापूर्वी मी कधीही अभिनय केला नव्हता. मला चित्रपट करायला खूप भीती वाटत होती. विशेष म्हणजे कुठलाही चित्रपट न करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर मी त्या अशा लोकांमधील आहे, ज्याने या इंडस्ट्रीतून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. असे व्यक्त केले.

https://www.instagram.com/p/CTBnCczDBNn/?utm_source=ig_web_copy_link

तसेच ‘अपयश येईल अशी सारखी भीती मला वाटायचे. मात्र प्रामाणिकपणे काम केल्याने ज्या प्रेक्षकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. मला असे वाटते की माझ्यापुढे आणखी एक लांब प्रवास आहे. मला इंडस्ट्रीत २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण तरीही अजूनही मी नोकरीच्या शोधात आहे.’ असेही अर्शद म्हणाला. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील अर्शदने साकारलेली ‘सर्किट’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मनं जिंकून गेली. मुन्नाभाई आणि सर्किटच्या धम्माल केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाले आहे.

अर्शद वारसीचे काही फोटो पहा.

 

महत्वाच्या बातम्या

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!