मुंबई : न्यूझीलंड क्रिकेट संघाचा महान फिरकी गोलंदाज एजाज पटेलने भारताविरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम केला. एका डावात 10 बळी घेणारा एजाज पटेल (Ajaz Patel) जगातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला. त्याच्या या जबरदस्त कामगिरीची सर्वत्र चर्चा होत असून वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) नेही ट्विट करत त्याचे अभिनंदन केले आहे. सेहवागच्या या ट्विटला एजाज पटेलनेही उत्तर दिले तर एजाज पटेलच्या उत्तरावर सेहवागने केलेल्या ट्विटची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
खरं तर, एजाज पटेलने एका डावात 10 विकेट घेतल्यानंतर वीरेंद्र सेहवागने ट्विट करून त्याचे अभिनंदन केले. यावर एजाज पटेलनेही सेहवागचे आभार मानले आणि एका मजेशीर घटनेचा उल्लेख केला आहे.
एजाज पटेलने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘धन्यवाद वीरेंद्र सेहवाग. मला अजूनही एक मजेदार घटना आठवते जेव्हा मी नेट बॉलर म्हणून आलो तेव्हा तुम्ही माझे चेंडू ईडन पार्कच्या बाहेर कसे पाठवले होते.’
त्याचवेळी वीरेंद्र सेहवागनेही या ट्विटला उत्तर दिले. त्याने लिहिले, “काळ नक्कीच बदलतो. तुम्ही मुंबईत मिळवलेले यश विलक्षण आहे. हे इतके मोठे आहे की, भारतापेक्षा तुमच्या जिंकण्याबद्दल जास्त चर्चा होत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात असेच यश मिळवत राहा.
Waqt ki aadat hai , badalta zaroor hai. What you have achieved in Mumbai is extra-ordinary so much so that India ki jeet se jyada aapke charche hain. May you achieve ever more success and good luck. https://t.co/yqA34WOGZG
— Virender Sehwag (@virendersehwag) December 6, 2021
एजाज पटेलने मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शानदार गोलंदाजी करताना टीम इंडियाच्या डावातील सर्व 10 बळी घेतले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी इंग्लंडचा जिम लेकर आणि भारताचा अनिल कुंबळे यांच्या नावावर हा विक्रम आहे. अजाज पटेलने 12 मेडन्समध्ये 47.5 षटकात 119 धावा देत 10 बळी घेतले. मात्र, त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्वाच्या बातम्या
भारताचा विजय! न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने कसोटीसह जिंकली मालिका
लवरकरच जाहीर होणार द. आफ्रिका दौऱ्यासाठीचा भारतीय संघ; रहाणेला मिळणार डच्चू
‘आमच्यासाठी पुनरागमन करणे अवघड पण..,’ न्यूझीलंडच्या खेळाडूचे विधान
रविचंद्रन अश्विनचा मोठा विक्रम; रिचर्ड हेडलीशी केली बरोबरी
न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलच्या ‘त्या’ विक्रमावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

