मुंबई : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या विरोधात संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत विरोधी पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची उमेदवारीसाठी सर्व सहमती असताना, त्यांनी मात्र यासाठी स्पष्ट नकार दर्शविला दिला आहे. यामुळे आता विरोधकांमध्ये राष्ट्रपती पदासाठी कोणता चेहरा उभा करावा, असा पेच उभा राहिला आहे. यासाठी आता कोणाला उमेदवारी देण्यात येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना विरोधी पक्षांकडून उमेदवारी देण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी फोनवरुन चर्चा केली आहे. राष्ट्रपतीपदाची उमेदवारी विरोधी पक्षांकडून स्वीकारण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली आहे. २०१७ मध्ये याआधीही गोपाळकृष्ण गांधी हे विरोधकांकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. पण या निवडणुकीत व्यंकय्या नायडू यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, विरोधकांकडून आणखीही इतर काही नावांचा देखील विचार केला जात आहे. गोपाळकृष्ण गांधी २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यांनी विरोधकांकडे याबाबत विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला असल्याचे सूत्रांची माहिती आहे. जर गोपाळकृष्ण गांधी यांनी होकार दिल्यास विरोधकांकडून सर्वसंमतीने त्यांच्या नावाला सहमत दिली जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

