मुंबई : देशात सद्या वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकारला नामवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. कालच, माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती.
यानंतर, आता विरोधी पक्षांनी पुढील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. विरोधी पक्षांची सूत्रे शरद पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता युपीएमधील काही नेत्यांनी वर्तवली आहे. तसे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भक्कम पर्याय म्हणून शरद पवार यांना एकमताने पंतप्रधानपदाच्या दाव्यासाठी समोर आणलं जाईल अशी शक्यता काही काँग्रेस नेत्यांच्या मागणीमुळे निर्माण झाली आहे.
दरम्यान, हे वृत्त पसरताच राज्यातील विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वृत्तावर भाष्य करताना काँग्रेसला टोला लगावला आहे. ‘सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास नाही म्हणूनच शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचं’ वक्तव्य त्यांनी केलं आहे.
सद्या युपीएची सूत्रे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आहेत. तर, विरोधी पक्षांना मरगळ आली असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे उतरती कळा थांबवून पुन्हा झेप घेण्यासाठी काँग्रेससह इतर विरोधी पक्ष देखील आपली रणनीती आखत आहेत. आता, शरद पवार यांच्याकडे युपीएच्या प्रमुख पदाची म्हणजेच देशातील विरोधी पक्षनेत्याची सूत्रे हाती देण्यात येणार आहेत. त्यामुळेच आता महाराष्ट्रासह राष्ट्रवादी काँग्रेसला देखील पंतप्रधान पदाची चाहूल लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मी पुन्हा येणार; तृप्ती देसाईंचं शिर्डी संस्थानला आव्हान!
- ‘आता फक्त ईडीने फोन केला तरी मी हजर होईन, समन्सची गरज नाही!’
- आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार!; ‘त्या’ रानगव्याला पुणेकरांची अनोखी श्रद्धांजली
- …अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांची मुंबईकरांना ताकीद
- शरद पवार पंतप्रधान होणार? अजित पवार म्हणतात…’माझ्या कानावर अजून काही नाही’


