Share

‘आता फक्त ईडीने फोन केला तरी मी हजर होईन, समन्सची गरज नाही!’

Published On: 

मुंबई : जवळजवळ २ आठवड्यांहून अधिक काळ ईडीला प्रतीक्षा करायला लावणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले होते. सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर सरनाईक पिता-पुत्र ईडी कार्यालयात हजर झाले.

प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी होणार आहे. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. आज सरनाईक यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांनी बाहेर येताच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीने कौटुंबिक, व्यवसायातील प्रश्न केले असता आपण सर्व उत्तर दिली असून ईडीचे समाधान झाले की नाही याची कल्पना आपल्याला नाही. मात्र, जर चौकशीसाठी पुन्हा बोलवायचंच असेल तर फक्त फोन केला तरी हजर राहीन, त्यासाठी समन्स देण्याची गरज नाही असं विधान करतानाच त्यांनी ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!