मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सद्या कोरोनाचे भय कमी झाले असले तरी संकट मात्र कायम आहे. कोरोना लसींबाबत दिलासादायक वृत्त असून हा रोग मुळासकट नष्ट व्हावा अशीच प्रत्येकाची इच्छा आहे.
सद्या लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाली असली तरी संकट मात्र कायम आहे. राज्यातील आकडेवारी मधल्या काही दिलासादायक आकड्यांपेक्षा वाढत आहे. त्यामुळेच खबरदारी घेणं गरजेचं असून राज्यातील यंत्रणेला तसे आदेश देखील देण्यात आले आहे. दरम्यान मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल मुंबईकरांना यांनी इशारा दिला आहे.
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. परवा मुंबईतील दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते. लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत मी मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल, अशी तंबीच त्यांनी एकप्रकारे मुंबईकरांना दिली आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मी पुन्हा येणार; तृप्ती देसाईंचं शिर्डी संस्थानला आव्हान!
- ‘मेधा पाटकरांना सुपारीबाज म्हणणारे भातखळकर हे लाचार नेते’, युवक कॉग्रेसचा प्रहार
- आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार!; ‘त्या’ रानगव्याला पुणेकरांची अनोखी श्रद्धांजली
- ‘मेधा पाटकरांना सुपारीबाज म्हणणाऱ्या भातखळकरांच्या डोक्यावर परिणाम झालाय’, राष्ट्रवादीचा घणाघात
- शरद पवार पंतप्रधान होणार? अजित पवार म्हणतात…’माझ्या कानावर अजून काही नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

