Share

आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार!; ‘त्या’ रानगव्याला पुणेकरांची अनोखी श्रद्धांजली

Published On: 

पुणे : काल शहरातील कोथरूड उपनगरातील महात्मा सोसायटीत रानगवा आला असल्याचे तेथील रहिवाशांनी कळवले होते. वनविभाग आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाने तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर रानगव्याला पकडले, मात्र काही वेळातच या प्राण्यानं आपला जीव सोडला.

सुमारे 5 तासांच्या धुमाकूळानंतर इंदिरानगर परिसरात गव्याला पकडण्यात वनविभागाला यश आले खरे, मात्र नंतर गव्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.गव्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दल चर्चांना उधान आले होते. दरम्यान रानगवा रस्ता चुकल्यामुळे बिथरला, बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे तो सैरावैरा धावू लागला. मात्र गवा बिथरल्याने तेथील बंगल्यांच्या भिंतींना धडका देत होता. त्यामुळे नाक, तोंडाजवळ जखम झाल्यामुळे रक्त वाहत होते.

मानवी वस्तीतुन बाहेर पाडण्यासाठीची धडपड अखेर निष्फळ झाली व या मुक्या प्राण्याला प्राण गमवावे लागले. सोशल मीडियातून या गव्याला श्रद्धांजली देत माणसांच्या वर्तनावर ताशेरे ओढण्यात आले होते. ती गर्दी व गोंधळ झाला नसता तर कदाचित रानगव्याचा जीव वाचला असता. या गव्याच्या मृत्यूनंतर त्याला अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

पुण्यात पासोड्या विठ्ठोबा, बुधवार पेठ येथे ‘आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार’ असा फेल्क्स पुण्यात लावले आहे. इतकेच नव्हे तर रानगव्याचा मोठा पुतळा उभा करुन श्रध्दाजंली वाहण्यात आली आहे. प्रसिद्ध उद्योजक मुरुडकर झेंडेवाले व फ्लॅग फॉऊडेशने शोकसंतप्त होऊन हे पाऊल उचलले आहे. किमान यामुळे माणसांना आपल्या चुकीची जाणीव होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!