नगर : साई मंदिरात प्रवेश करताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन साई संस्थानने केलेले आहे. साई मंदिर परिसरात तशा आशयाचे फलकही लावण्यात आलेले आहेत. साई संस्थानच्या याच आवाहनावर आक्षेप घेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. आज शिर्डीमध्ये जात मंदिर संस्थानने लावलेला ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच असा निर्धार करूनच तृप्ती देसाई पुण्यातून निघाला होत्या.
मात्र, याआधीच शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील साई संस्थानच्या निर्णयाला समर्थन दिलं होतं. तर, शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली, तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व ‘शिवसेना स्टाइल’ने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला होता. यामुळेच संभाव्य वादाची परिस्थिती बघता व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर बंदी घालण्यात आली आहे. विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे शिर्डी विभाग यांनी संबंधित आदेश दिले असून शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना आदेशाची नोटीस देखील दिली होती.
तरीदेखील आज सकाळी काही महिला कार्यकर्त्यांना घेऊन त्या शिर्डीच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र, त्या शिर्डीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. नगर पोलिसांनी त्यांना सूप येथे रोखले. यानंतर, काही काळ संघर्ष देखील झाला. अखेरीस पोलिसांनी त्यांना अटक केली. काही कालापाउर्वी पोलिसांनी त्यांची मुक्तता केली असून त्यांना परत पुण्यास जाण्यास सांगितले आहे.
या सर्व घडामोडीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना साई संस्थानला ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत तो फलक न हटवल्यास तो फलक स्वतः हटवणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. मी तो फलक हटवण्यास पुन्हा येणार असल्याचं सांगत त्यांनी फलकाचं समर्थन करणाऱ्यांवर देखील त्यांनी हल्लाबोल चढवला.
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कोणामध्ये असेल तर ती शरद पवार साहेबांमध्येच’
- ‘मेधा पाटकरांना सुपारीबाज म्हणणाऱ्या भाजप आमदार भातखळकरांना राष्ट्रवादीच्या रणरागिणीने झापलं’
- ‘रावसाहेब दानवे जोड्याने मारायच्या लायकीचे’
- राज्य सरकारने घोषणा केलेल्या शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये
- ‘मेधा पाटकरांना सुपारीबाज म्हणणाऱ्या भातखळकरांच्या डोक्यावर परिणाम झालाय’, राष्ट्रवादीचा घणाघात


