Share

शरद पवार पंतप्रधान होणार? अजित पवार म्हणतात…’माझ्या कानावर अजून काही नाही’

Published On: 

मुंबई : देशात सद्या वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकारला नामवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. कालच, माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती.

यानंतर, आता विरोधी पक्षांनी पुढील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. विरोधी पक्षांची सूत्रे शरद पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता युपीएमधील काही नेत्यांनी वर्तवली आहे. तसे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भक्कम पर्याय म्हणून शरद पवार यांना एकमताने पंतप्रधानपदाच्या दाव्यासाठी समोर आणलं जाईल अशी शक्यता काही काँग्रेस नेत्यांच्या मागणीमुळे निर्माण झाली आहे.

दरम्यान, हे वृत्त पसरताच राज्यातील विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘अजून तर माझ्या कानावर काही नाही. पवार साहेब दिल्लीत गेले की आशा बातम्या येत असतात. साहेब मुख्यमंत्री असताना अनेक नेत्यांशी सबंध आले होते.’ असं विधान त्यांनी केलं आहे.

तर, भाजप आमदार भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. ‘पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?… पवारांच्या डिक्शनरीत विश्वासघाताला चमत्कार म्हणतात, हे केवळ जाणते पवारच करू जाणे, भाजपावाल्याना हे ‘कौशल्य’ जमायचं नाही…’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!