मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली ‘रोखठोख’ भूमिका जाहीर केली आहे. ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, कोरोना संकटांच्या पार्श्वभूमीवर समाजाने संयम पाळावं असं आवाहन सर्वच नेत्यांनी केलं होतं.
दरम्यान, गेल्या चार दिवसात संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा करून विविध भागांमध्ये जाऊन समाज बांधवांच्या भेटी व बैठका घेऊन त्यांच्या भावना समजावून घेतल्या आहेत. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
समाजाच्या संतप्त भावना समजून घेतल्यानंतर तसंभाजीराजे यांनी आता रणशिंग फुंकले आहे. ‘कोरोनाच्या काळात जीव महत्वाचा आहे. मात्र, मराठा समाजाला गृहीत धरलं जात असून आता हद्द पार झाली असल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी समाजाच्या प्रमुख ५ मागण्या केल्या असून त्या मान्य न झाल्यास ६ जून पासून मोठं आंदोलन छेडलं जाईल असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.
यांनतर, माध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार हे देखील या आंदोलनास उपस्थित राहणार का ? असा सवाल केला. यावर संभाजीराजे म्हणाले, ‘शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी देखील ६ जूनच्या आंदोलनात सहभागी व्हावं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा, रस्ताही मी त्यांना आमंत्रित केलं आहे.’
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा विळखा होतोय घट्ट, आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान!
- दिलासा…औरंगाबादेत पॉझिटिव्हीटी रेट २.२७ टक्क्यांपर्यंत खाली, तर रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांवर!
- पुण्यातील लॉकडाऊनमध्ये मोठा बदल, राजेश टोपेंनी केली घोषणा
- अखेर स्मार्ट सिटी बसला मिळाला मोबदला, १ कोटी ७० लाख आले, ८ लाख बाकी!
- मुख्यमंत्र्यांना ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम; ‘या’ पाच गोष्टी मान्य न केल्यास शिवराज्याभिषेक दिनापासून आंदोलन !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
