Share

मुख्यमंत्र्यांना ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम; ‘या’ पाच गोष्टी मान्य न केल्यास शिवराज्याभिषेक दिनापासून आंदोलन !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली ‘रोखठोख’ भूमिका जाहीर केली आहे. ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, कोरोना संकटांच्या पार्श्वभूमीवर समाजाने संयम पाळावं असं आवाहन सर्वच नेत्यांनी केलं होतं.

दरम्यान, गेल्या चार दिवसात संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा करून विविध भागांमध्ये जाऊन समाज बांधवांच्या भेटी व बैठका घेऊन त्यांच्या भावना समजावून घेतल्या आहेत. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

समाजाच्या संतप्त भावना समजून घेतल्यानंतर तसंभाजीराजे यांनी आता रणशिंग फुंकले आहे. ‘कोरोनाच्या काळात जीव महत्वाचा आहे. मात्र, मराठा समाजाला गृहीत धरलं जात असून आता हद्द पार झाली असल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी समाजाच्या प्रमुख ५ मागण्या केल्या असून त्या मान्य न झाल्यास ६ जून पासून मोठं आंदोलन छेडलं जाईल असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहेत ‘त्या’ ५ मागण्या ?

१) ९ सप्टेंबर 2020 च्या आधीच्या उमेदवारांना नियुक्ती देऊन टाका.

२) शाहू महाराजांच्या नावाने उभं केलेल्या सारथीसाठी कमीत कमी १ हजार कोटी द्यावे. मुख्यमंत्री म्हणाले जागा दिलीये, पण नुसतं जागा देऊन काय होणारे ? तिथं चांगली लोकं द्या…नाही तर रद्द करून टाका, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.

३) अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुन्हा उभारणी करा.

४) प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तयार करा, हे राज्य सरकारच्या हातात आहे. ते तरी करा

५) ७० टक्के गरीब मराठा समाजाची चुक काय ? मराठा समाज देखील बहुजनांचा घटक त्यांनाही सवलती द्या !

‘६ जून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे, जर ६ जून पर्यंत या पाच गोष्टींवर निर्णय झाला नाही तर पवित्र रायगडावरून आंदोलनाची सुरुवात करणार. सगळ्या आमदार खासदारांना घेऊन 6 जून ला उतरणार. आता फक्त लोकांची नाही या खासदार-आमदारांचीही जबाबदारी आहे,’ असं सडेतोड भाष्य संभाजीराजे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!