Share

औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा विळखा होतोय घट्ट, आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गातून बरे झालेल्या बहुसंख्य रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. सध्या औरंगाबाद शहरातील १४ रुग्णालयांमध्ये ३११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.यात सर्वाधिक ८० रुग्ण घाटी रुग्णालयात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. औरंगाबाद शहरात व मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत वर्षभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरु असून त्यात आता कोरोनातून परतल्यावरही अनेकांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. या इन्फेक्शनमुळे अनेकांना आपला डोळा गमवावा लागत आहे. काही जणांवर शस्त्रक्रिया करून जबडा काढून टाकला आहे.

शहरातील १४ रुग्णालयांमध्ये या आजाराचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यात शहरातीलच नव्हे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील रुग्णांनाही समावेश आहे. म्युकरमायकोसिसचे गंभीर स्वरुप पाहता महापालिकेकडून सर्व हॉस्पिटल कडून नियमित अहवाल मागविला जातो. गुरुवारच्या अहवालानुसार १४ हॉस्पिटलमध्ये एकुण ३११ रुग्ण उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिस या आजारात ४० ते ६० या वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त आहे.

घाटीत ८० रुग्णांवर उपचार सुरु असून यात दोन तरुणांचा समावेश आहे. कोरोनानंतर शहरात म्युकरमायकोसिसने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. यात कोरोनानंतर, डायबिटिस असलेले रुग्ण, स्टेरॉइड्च्या जास्त वापरामुळे, ऑक्सिजन बाटल्यांमध्ये डिस्टिल्ड वॉटर वापरण्याकडे दुर्लक्ष यामुळे म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. प्रकृती गंभीर असलेले कोरोना रुग्ण अनेक दिवस रुग्णालयात असतात. अशावेळी त्यांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस जास्त पसरू नये म्हणून रुग्णांना इंजेक्शन दिले जाते. रुग्णांचा बचाव होईल या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे, तज्ज्ञांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!