औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने मनपाला स्मार्ट बस दिल्या. मात्र त्याचे पैसे सिटीबस व्यवस्थापनाला देण्यात आलेले नव्हते. याचे तब्बल १ कोटी ७८ लाख रुपये थकले होते. ही रक्कम मिळत नसल्यानेे स्मार्टबस संकटात सापडण्याची भीती व्यवस्थापनाकडून व्यक्त केली जात होती. अखेर पहिल्या लाटेत दिलेल्या सेवेचे पैसे दुसरी लाट संपल्यावर सिटी बस प्रशासनाला मिळाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या आर्थिक संकटात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र दुसऱ्या लाटेसाठी दिलेल्या बसेसचे पुन्हा ७० ते ८० लाख थकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद शहरातील स्मार्ट सिटीबस सेवा प्रशासनाने कोरोना काळात मार्च २०२० पासून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर औरंगाबादेत कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने कोरोनाबाधितांची व वैद्यकीय कर्मचार्यांची ने-आण करण्यासाठी प्रशासनाने या बस वापरात घेतल्या. १०० पैकी सुमारे ६० बस या कामासाठी वापरण्यात आल्या. ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तर शहरासाठी महापालिकेने या बसचा वापर केला. या खर्चाचा परतावा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने जिल्हाधिकारी कार्यालय व पालिकेकडे मागितला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपा प्रशासनाकडून १ कोटी ७० लाख आले आहेत. मात्र यातील ८ लाख येणे बाकी आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या लाटेने डोके वर काढले होते. पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. त्यावेळी पुन्हा एकदा स्मार्ट सिटी बस रुग्णांच्या मदतीला धावल्या. गेल्या दोन महिन्यांपासून मनपास २६ तर जिल्हा प्रशासनास २ बस देण्यात आल्या आहेत. याचे ७० ते ८० लाख पुन्हा एकदा थकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- महापालिकेच्या दिड कोटींच्या भूखंडावरील अतिक्रमण जमीनदोस्त!
- राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही ?, जयंत पाटलांनी दिले ‘हे’ उत्तर
- धक्कादायक! सुनेच्या जाचास कंटाळून सासऱ्याची आत्महत्या!
- ‘शिवराज नारियलवाले यांना जबर मारहाण करणार्या दोषींवर कठोर कारवाई करा’
- हात जोडून सांगतो माझं-तुझं न करता समाजासाठी एकत्र येऊ; संभाजी राजेंचं फडणवीसांना साकड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

