Share

दिलासा…औरंगाबादेत पॉझिटिव्हीटी रेट २.२७ टक्क्यांपर्यंत खाली, तर रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांवर!

Published On: 

औरंगाबाद : गेल्या काही दिवसात शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यात आपण यशस्वी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच पूर्वी ३९ टक्क्यांपर्यंत गेलेला पॉझिटिव्हीटी रेट आता २.२७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. महानगरपालिकेच्या ताज्या अहवालानुसार शहरातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांपर्यंत वाढल्याने एकुणच औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे.

फेब्रुवारी महिन्यात शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाधित रुग्णांची संख्या देखील वाढली होती. मात्र मागील काही दिवसांपासून सक्रीय रुग्णांमध्ये कमालीची घट होत चालली आहे. सद्यस्थितीत शहरात ४ हजार सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च महिन्यापासून औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. घराघरात बाधित रुग्ण आढळून येत आहे. मार्च महिन्यात तर रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता.

एकाच महिन्यात ३२ हजार बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ३३ टक्क्यांवर गेला होता. मात्र प्रशासनाने होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करुन दिली. कोविड सेंटर सुरु करण्यात आले. तपासणी, कडक निर्बंध, ब्रेक द चेन या सर्व उपाययोजनांमुळे बाधितांचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. गेल्या दोन दिवसात शहरात ९९, ९८ एवढी रुग्णसंख्या आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गाफील न राहता नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जेणेकरून रुग्णसंख्येचा घटता आलेख तसाच राहिल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!