पुणे : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं होतं. मात्र, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ जूननंतर सरसकट लॉकडाऊन उठणार नाही, असं भाष्य केलं होतं. दरम्यान, राजेश टोपे हे आज पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी राज्यातील लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढणार, असं सूतोवाच केलं आहे.
तर, पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
‘राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यानुसार आता पुण्यात सकाळी सात ते अकरा या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत,’ असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा विळखा होतोय घट्ट, आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान!
- दिलासा…औरंगाबादेत पॉझिटिव्हीटी रेट २.२७ टक्क्यांपर्यंत खाली, तर रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांवर!
- सोमवारपासून दिल्लीत ‘अनलाॅक’ ; मुख्यमंत्री केजरीवाल यांचा मोठा निर्णय
- अखेर स्मार्ट सिटी बसला मिळाला मोबदला, १ कोटी ७० लाख आले, ८ लाख बाकी!
- महापालिकेच्या दिड कोटींच्या भूखंडावरील अतिक्रमण जमीनदोस्त!


