🕒 1 min read
अकोला : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातुन काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत गुवाहटीला नेले होते. त्यावेळी राज्यातील राजकारणामध्ये खूप उलाढाल झालेली पाहायला मिळाली. गुवाहटीला गेलेल्यांपैकी शिवसेनेचे नेते नितीन देशमुख हे एकमेव होते, तिकडून आल्यानंतर जे उद्धव ठाकरेंकडे परत गेले. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत युती करून महाराष्ट्र राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली असून, शिंदेगट आणि ठाकरे गट असंं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले नितीन देशमुख ?
महाराष्ट्र राज्यात पैशांच्या मदतीने सत्तांतर झाले असून मी ते सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन, असं नितीन देशमुख म्हणाले आहेत. काल म्हणजेच रविवारी अकोला जिल्ह्यामध्ये एका सभेला नितीन देशमुख उपस्थित असून, त्यावेळी ते बोलत होते.
मी सत्तांतराच्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आहे –
पुढे ते बोलताना असंही म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मागील दीड वर्षांपासून षडयंत्र सुरू होतं. हे षडयंत्र आताचे नव्हते. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार आहे.
ज्या लोकांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवले. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्या सर्वांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावर पुन्हा चुकीची कारवाई केली, तर मी माझ्याकडील त्यासर्व क्लीप बाहेर काढणार असल्याचं नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील – एकनाथ शिंदे
- Deepak Kesakar | “वाघ हा वाघच असतो, त्याने डरकाळी फोडली अन्…”; केसकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- Ramdas Kadam | “बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा काही संशय आहे का?” रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- Ramdas Kadam | “नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; रामदास कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
