Share

Bhaskar Jadhav | “मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी…” भास्कर जाधवांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या कोकणामधील रत्नागिरीत शिंदे गटाने रविवारी पहिला मेळावा घेतला. शिंदे गटातील नेते रामदास कदम दापोली येथील सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अशातच रामदास कदम यांना प्रत्युत्तर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दिले आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव ?

मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली, असं म्हणत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना चांगलंच फटकारलं आहे. जाधवांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. रामदास कदम यांनी घेतलेली सभा राजकीय वैचारिकतेला छेद देणारी आहे. त्यांनी वापरलेली भाषा आजतागायद कोणीही वापरली नाही. त्यांचे भाषण ऐकल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील महिला त्यांची जोड्याने पुजा करतील, असंही ते म्हणाले आहेत.

रामदास कदमांना तातडीने वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा –

भास्कर जाधव आणि त्यांची पत्नी माझ्या पाया पडले, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. त्यावर वडिलांचं निधन झाल्यानंतर रामदास कदम, सुनील तटकरे, अनंत गिते, हसन मुश्रीफ आले  होते. समवयस्कर मंडळी असलेल्या सर्वांच्या आम्ही दोघंही पाया पडलो. मात्र, रामदास कदम याचा अर्थ राजकारणाशी जोडत आहेत. त्यामुळे रामदास कदमांना तातडीने वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे, असं जाधव यांनी सांगितलं.

रामदास कदमांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर केलेली टीका –

दरम्यान, आमचे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासतायत आणि त्यांचा मुलगा टुणटुण टुणटुण खोका, खोका करत उड्या मारत आहेत. आता हा म्हणतंय बोका आणि नाव घेतंय खोका, असं वक्तव्य रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्या ठाकरे यांच्याविरोधात केलं आहे. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील, माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या आणि सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला असल्याचं कमदमांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!