नवी दिल्ली- देशाच्या इतिहासात प्रथमच सहकार मंत्रालयाची स्थापना करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मास्टर स्ट्रोक लगावला. या मंत्रालयामुळे राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव निर्माण झाल्याची चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज अमित शाहांची भेट घेणार आहेत.
ही भेट दुपारी दोन वाजता होणार असून अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. सहकार मुद्द्यावर ही भेट असल्याची सूत्रांची माहिती असून पवारांसोबत साखर संघटनेचे नाईकनवरे, दांडेगावकरही असणार असं कळतंय.
दरम्यान,काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी राज्यातील काही साखर कारखान्यांत गैरव्यवहार झाल्याचं सांगत अमित शहा यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर सहकार मंत्रालय हे अमित शहा यांच्याकडे आलं आणि त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली असून त्यातही साखर कारखान्यांतील गैरव्यवहाराबाबत चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाला धक्का! दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी सलामीवीर मंयक अग्रवाल बाहेर
- शहरातील विविध विकासकामाला गती देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी घेतली बैठक
- बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप
- सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

