Share

लसीकरणाच्या मोहिमेबाबत राजेश टोपेंनी केला महत्वाचा खुलासा!

Published On: 

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. कालपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुसरीकडं, कोरोना लसींबाबत दिलासादायक वृत्त हाती येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह हैद्राबाद व अहमदाबादमधील लस संशोधन करणाऱ्या कंपन्यांच्या दौऱ्यानंतर प्रशासनाला लसीकरणाच्या तयारीचे निर्देश देण्यात आले होते.

तर, नेमकी लस कधी येणार? सर्वसामन्यांना परवडणार का? प्राधान्यक्रम कसा असेल? कितपत उपायकारक असेल? दुष्परिणाम असतील का? हे व असे कित्येक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनाच्या लसीसंदर्भातील ही प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे.

याबाबत आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुन्हा एकदा महत्वाचा खुलासा केला आहे. ‘केंद्र सरकारने दिलेल्या कार्यक्रमानुसार राज्य सरकारकडून लसीकरणाचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर शीतगृहांच्या कमतरतेबाबत केंद्राला कळवण्यात आलं असून, केंद्राकडून त्याबाबत आश्वासन देण्यात आलं आहे. आपल्याला नागरिकांना दोन वेळा लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत राज्य सरकारने मायक्रो प्लॅनिंग देखील केलं आहे,’ अशी माहिती टोपेंनी दिली आहे. यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे आरोग्य विभागाचा ट्रेनिंगचा भाग पूर्ण झाला आहे. एकूण 16 हजार आरोग्य कर्मचारी आहेत. त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं आहे, असा खुलासा देखील त्यांनी केला असून लसीकरणाची संपूर्ण तयारी झाल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!