🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा सध्या राजकारणातील चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसत आहे. दसऱ्याला अवधी असला तरी शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांविरूद्ध दंड थोपटून मैदानासाठी मैदानात उतरले आहेत. नेहमी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानात होतो. याच मैदानासाठी आता दोन्ही गटात जोरदार रस्सीखेच होताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिलाय.
शरद पवार काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे कान टोचले. ‘मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण असे वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री पक्षाचे नसतात तर राज्याचे असतात. ते कोणा एका पक्षाचे नसतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे’, असं शरद पवार म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत शरद पवारांना व्हिलनच्या भूमिकेत पडद्यावर उभं केलं. त्यामुळे एकनाथ शिंदे शरद पवारांचा सल्ला ऐकणार का?, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील शिवसेनेच्या दोन्ही गटाला वाद न घाल्याचं आवाहन केलं आहे. आधी एकाचा कार्यक्रम होईल, मग दुसऱ्याचा, वाद घालू नका, असं अजित पवार म्हणाले.
नितीश कुमारांची भेट घेणार
बिहारमध्ये भाजपला धक्का देत नितीश कुमारांनी नवी बैठक मांडली. त्यानंतर आता भाजपचे मित्रपक्ष संपल्यात जमा आहेत. अशातच आता शरद पवारांनी देशपातळीवर नवी समीकरणं जुळवण्यास सुरूवात केली आहे. नितीश कुमार येत्या 8 सप्टेंबर रोजी दिल्लीत शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यावेळी केंद्रात नवा पर्याय उभा करण्यासाठी महत्त्वाची चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. नितीश कुमारांच्या नियोजित भेटीमुळे शरद पवारांनी भाजपच्या जखमेवरची खपली काढल्याचं पहायला मिळतंय.
महत्त्वाच्या बातम्या
- Abdul Sattar । आगामी काळातील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नावाने होतील – अब्दुल सत्तार
- Narayan Rane | दोन शिवसैनिक एकत्र दिसणार?, नारायण राणे यांच्या उत्तराने शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य खुललं, म्हणाले…
- Ashish Shelar | आम्ही ‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का?; आशिष शेलार यांचं थेट उद्धव ठाकरे यांना पत्र
- Ajit Pawar | भाजप-मनसे युतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Eknath Shinde | देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीवर एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य म्हणाले…
- Narayan Rane | “उरलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
