🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या भाजप आणि मनसे युती करणार असल्याची चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांनी शिंदे गटातील अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे देखील गणपती दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गेले होते. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टोला लगावला आहे.
अजित पवार यांची प्रतिक्रियाः
वर्षानुवर्ष संपुर्ण महाराष्ट्रातली जनता बघत होती की शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच सभा शिवाजी पार्कवर व्हायच्या. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितलं होतं की इथून पुढे ही शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल, असं अजित पवार म्हणाले.
ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना हव्या त्या गोष्टी करत असतात. वाद तर घालून चालणार नाही. शेवटी संख्येच्या प्रमाणात जनता कुणाच्या पाठिशी आहे, ते शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच लक्षात येईल आणि निवडणूक झाल्यानंतर कळेलच की कुणाची शिवसेना खरी आहे, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
दरम्यान, भाजप आणि मनसेच्या होणाऱ्या भेटींवर अजित पवार यांनी निशाणा साधला. तुम्हीच ओळखा, याआधी गणेशोत्सव वर्षानुवर्ष चालत आले आहेत. पण कधीही मागच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणी गणपतीच्या दर्शनाला कुणाच्या घरी गेले नाहीत. आम्हीही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही त्यांच्यासारखे कॅमेरे बरोबर घेऊन जात नाही. पण आता प्रवेश करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, कुणीतरी उतरतं. ते आत जातात. नमस्कार करतात. कशाला?, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Ashok Chavan | अशोक चव्हाण काँग्रेसच्या 12 आमदारांसह भाजपात जाणार?, अशोक चव्हाण म्हणाले…
- Aditya Thackeray | याआधी एवढा निर्लज्जपणा कोणी केला नव्हता-आदित्य ठाकरे
- Aditya Thackeray | मुखवटे घालून फिरणाऱ्यांचे मुखवटे आता लवकरच फाटणार आहेत”
- Ambadas Danave | “…तर राज्यपालांचा पक्षपातीपणा स्पष्ट होईल”; अंबादास दानवे
- Raosaheb Danave | भाजप पक्षाला दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात इंटरेस्ट नाही- रावसाहेब दनवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
