मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या अभूतपुर्व बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरण झपाट्याने बदलल्याचं पहायला मिळालं. गणेश दर्शनानिमित्त राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. शिवसेनेतील फुटीचा फायदा घेत भाजपची मुंबई महापालिकेसाठीची महत्त्वकांक्षा अधिक स्पष्ट होताना दिसत आहे. अशातच आता मुंबई भाजपची कमान सांभाळणाऱ्या आशिष शेलार यांनी (Ashish Shelar) थेट उद्धव ठाकरे यांनी चिमटे काढले आहेत.
आशिष शेलार यांंचं चोख प्रत्युत्तर
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी भाजपचा उल्लेख कमळाबाई असा करायचे. त्यावर सरई चढवत सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा भाजपची खिल्ली उडवली गेली. झारखंड, दिल्लीमध्ये ऑपरेशन लोटसचा प्रयत्न फसल्यानंतर ‘कमळाबाई’ची वाईट नजर आता कॉँग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेत महाराष्ट्रात कॉँग्रेसमध्ये फूट पाडण्याची ‘हात’घाई भाजपकडून सुरू असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय? हरकत नाही… बाईमधये, आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. मग तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला आम्ही आता पेग्विन सेना म्हणायचे का?, असा सवाल आशिष शेलारांनी विचारला आहे. पत्राच्या मायन्यात शेलारांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत तोफ डागली.
बाळासाहेब ठाकरे भाजपची भर कार्यक्रमात कमळाबाई म्हणून खिल्ली उडवायचे. सुप्रिया सुळे यांना लोकसभेत बिनविरोध निवडून आणताना तुम्ही कमळीची काळजी करू नका, असा शब्द बाळासाहेबांनी शरद पवारांना दिला होता. तर इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने फारकत घेतली. त्यावेळी कमळाबाई आम्हाला सोडून गेली, अशा शब्दात बाळासाहेबांनी घणाघात केला होता.
राणीच्या बागेतील पेग्विंगवरून भाजपने माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचण्यास सुरूवात केली होती. मागील काही काळात हा मुद्दा नितेश आणि निलेश राणे यांनी लावून धरला होता. त्यानंतर आता याच शब्दांवरून भाजप शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत.
कृपया,हे लक्षात असू द्या!@OfficeofUT pic.twitter.com/w1DFqYbU6q
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 3, 2022
महत्त्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | भाजप-मनसे युतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Eknath Shinde | देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीवर एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य म्हणाले…
- Narayan Rane | “उरलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ”
- Ashok Chavan | अशोक चव्हाण काँग्रेसच्या 12 आमदारांसह भाजपात जाणार?, अशोक चव्हाण म्हणाले…
- Aditya Thackeray | याआधी एवढा निर्लज्जपणा कोणी केला नव्हता-आदित्य ठाकरे
- Aditya Thackeray | मुखवटे घालून फिरणाऱ्यांचे मुखवटे आता लवकरच फाटणार आहेत”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

