Share

Eknath Shinde | देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीवर एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गुरूवारी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरळी येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. इतकेच नाही तर चव्हाण यांच्यासह 12 काँग्रेसचे आमदारही भाजपात जाणार असल्याचंही बोललं जात आहे. अशातच याच मुद्यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे.

एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य-

खरं म्हणजे काँग्रेसबद्दल मी बोलत नाही. सभागृहात मी बोललोय. त्यांची जी फरफट सुरु आहे ती आपण पाहत आहोत. कोणावर टीका करण्याचा माझा स्वभाव नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. आज एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील ‘अधिश’ या निवासस्थानी जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

तसेच, पत्रकाराने आणखिन एक सवाल एकनाथ शिंगे यांना केला असता, त्यावर ते म्हणाले की, आम्ही कोणालाही रस्ता दाखवला नाही जे आधी व्हायला हवं होतं ते आत्ता झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीची 12 नावांची यादी रद्द करा-

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार असताना विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने पाठवलेली 12 नावांची यादी खूप दिवसांपासून लांबणीवर असताना. अशातच ती 12 नावांची यादी रद्द करा असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवले असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!