🕒 1 min read
मुंबई : गुरूवारी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरळी येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. इतकेच नाही तर चव्हाण यांच्यासह 12 काँग्रेसचे आमदारही भाजपात जाणार असल्याचंही बोललं जात आहे. अशातच याच मुद्यावरून भाजप पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.
नारायण राणे यांची प्रतिक्रिया-
काँग्रेसचे नेते शिंदेसोबत आले तर ते शिवसैनिक होतील. ते काँग्रेसवाले म्हणून येत नाही. ते शिंदेंच्या शिवसेनेत येत आहेत. ते शिवसैनिक होणार. उलट ते चांगलं काम करत आहेत, असल्याचं नरायण राणे यांनी म्हटलं आहे.पत्रकारांशी नारायण राणे यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. तसेच पत्रकारांनी त्यांना काँग्रेस पक्षाचे नेते हिंदुत्वाची भूमिका स्वीकारणार याबद्दल काय वाटतं? असा सवाल केला असता, ते काँग्रेसचे राहणार नाहीत. एकतर ते शिंदेंकडे शिवसैनिक म्हणून जातील किंवा भाजपामध्ये येतील, असं ते म्हणाले. पुढे ते असंही म्हणाले की, आणि उरलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ.
भाजपा मोहिम नाही करत कृती करते-
तसेच, 12 ते 13 काँग्रेसचे लोक जाणार आहेत अशी चर्चा आहे. तर उद्धव ठाकरे यांना झटका दिल्यानंतर काँग्रेसला झटका देण्यासाठी भाजपा काही मोहीम लावत आहे का? असा सवाल पत्रकारांनी केला. यावर राणे म्हणाले की, भाजपा मोहिम नाही करत कृती करते.
दरम्यान, नारायण राणे यांच्या जुहूतील ‘अधिश’ या निवासस्थानी जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायाचे दर्शन घेतले असल्याचं समजतं आहे. त्याठिकाणी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणेही उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । दसरा मेळाव्यावरुन वातावरण तापलं ! शिवसेनेनंतर शिंदे गटाकडूनही महापालिकेत परवानगीसाठी अर्ज दाखल
- Radhakrishna Vikhe Patil । प्रस्ताव आला तर विचार करु; चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबाबत विखे पाटलांचे मोठं वक्तव्य
- Aditya Thackeray | ज्यांना स्वच्छ राजकारण पाहिजे ते आमच्या सोबत उभे आहेत – आदित्य ठाकरे
- Raosaheb Danve । “राज ठाकरेंनी निमंत्रण दिले तर अमित शहा नक्की जातील कारण…”; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितले
- Sudhir Mungantiwar | शिंदे-फडणवीस सरकार हे स्थिर सरकार आहे – सुधीर मुनगंटीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
