मुंबई- माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. गेली काही वर्ष पक्षातलं महत्व कमी झाल्यानं नाराज असलेले खडसे पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या बातम्या होत्या. अखेर काल भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. उद्या म्हणजेच २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांनी एकनाथ खडसेंच स्वागत केलं आहे. तर, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील एकनाथ खडसेंनी घेतलेल्या निर्णयाला समर्थन दिलं आहे. ‘एकनाथ खडसेंची मी काल भूमिका ऐकली. त्यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य असेल म्हणून त्यांनी प्रवेश दिला असेल’ असं ते म्हणाले.
ते उगाच कोणालाही पक्षात घेणार नाहीत
तसंच, ‘शरद पवार हे त्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते राजकारणातले सगळ्यात अनुभवी आणि तालेवार नेते आहेत. ते उगाच कोणालाही पक्षात घेणार नाहीत. खडसेंची भूमिका त्यांना पटली असेल. जे सोडून गेले त्यांना परत घेणार नाही अशी कडक भूमिका घेणाऱ्या पवारांनी भाजपमधल्या प्रमुख नेत्याला पक्षात घेणे म्हणजे त्यांचे काही राजकीय गणितं असू शकतात’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- पोलिसांवर हात उचलणाऱ्या यशोमती ठाकूर यांना न्यायालयाचा दिलासा
- शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा होणार खंडित !
- ‘खडसेंचे वक्तव्य मी जेव्हा ऐकले तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली’
- ‘सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

