पुणे- माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. गेली काही वर्ष पक्षातलं महत्व कमी झाल्यानं नाराज असलेले खडसे पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या बातम्या होत्या. अखेर काल भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसेंनी आपली भूमिका मांडली. गेली 40 वर्ष मी भाजपाचं काम केलं. पक्षानंही मला बरंच काही दिलं. पक्षाच्या नेत्यांवर वा पक्षावर जराही राग नाही. उलट भाजपा सोडताना खंत आहे. मला देवेंद्र फडणवीसांनी छळलं. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं ते म्हणाले.
माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. स्नुषा रक्षाताईं खडसेही भाजपा सोडणार नाहीत, असं खडसे यांनी स्पष्ट केलं. खडसे उद्या, शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातमीमुळे काल जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
खडसे यांच्या या निर्णयावर कालपासून विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देखील ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे म्हणजे भारतीय जनता पार्टीमधील राज्यातील सर्वात मोठं नेतृत्व. खरंतर एकनाथजी खडसे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून राज्यभरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती तसेच अनेक मंत्रीपदे त्यांच्याकडे होती आणि सर्वसामान्यांची कामे सुद्धा त्यांच्या माध्यमातून तात्काळ पार पाडली जायची.परंतु मध्यंतरी एकनाथ खडसे यांच्यावर झालेले आरोप-प्रत्यारोप, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्यामुळे त्यांना दिला गेलेला मानसिक त्रास हे त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होते परंतु तरीही त्यांनी अनेक वर्ष सहन केले असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, त्यानीच वाढवलेला पक्ष जेव्हा मानसन्मान ऐवजी जास्तीत जास्त त्यांचा अपमान कसा करता येईल असा प्रयत्न काही जणांकडून करण्यात येत होता. त्यामुळे एकनाथजी खडसे यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे आणि तितकाच भारतीय जनता पार्टीसाठी धोकादायक आहे.एकनाथजी खडसे म्हणजेच सगळ्यांचे आवडते नाथाभाऊ यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा आणि लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर ते विराजमान होतील यात शंकाच नाही.
दरम्यान,एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. दरम्यान,प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भाजपसाठी काम केले होते. त्यांच्या कार्याला तोड नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
महत्वाच्या बातम्या-
- कोरोनाची लस आल्यावर सर्वात आधी कुणाला मिळणार ? टोपे म्हणाले…
- शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा होणार खंडित !
- ‘खडसेंचे वक्तव्य मी जेव्हा ऐकले तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली’
- ‘सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’
- ‘महाराष्ट्र सरकार’चा CBIला जोरदार धक्का; घेतला ‘हा’ खूप मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

