मुंबई- कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने ठाकूर यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर येत आहे.
पोलीस कॉन्स्टेबलवर हात उचलणे यशोमती ठाकूर यांच्या चांगलेच अंगाशी आले होते. ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिर परिसरात पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २४ मार्च २०१२ रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. यानंतर यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली होती.
या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले होते. मी स्वतः वकील आहे. न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणे योग्य नाही. पण आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. शेवटी सत्याचाच विजय होईल अशी प्रतिक्रीया अॅड. यशोमती ठाकूर यांनी यावर व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या-
- कोरोनाची लस आल्यावर सर्वात आधी कुणाला मिळणार ? टोपे म्हणाले…
- शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा होणार खंडित !
- ‘खडसेंचे वक्तव्य मी जेव्हा ऐकले तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली’
- ‘सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

