मुंबई- भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं खडसे यांनी काल मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याची टीकाही केली आहे.
मात्र काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खडसेंनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचेही नाव घेतलं. ‘अंजली दमानिया यांनी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यावेळी पोलिस गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. पण फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला’, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एकनाथ खडसे कालच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यावर मी न बोलण्याचा निर्णय घेतला होता कारण ते काय म्हणाले हे मी प्रत्यक्षात ऐकले नव्हते.पण रात्री मी जेव्हा ऐकले तेव्हा तळ पायाची आग मस्तकात गेली
याच विषयावर आज मी मुंबई मराठी पत्रकार संघात संध्याकाळी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहे— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 22, 2020
दरम्यान, अंजली दमानिया यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “एकनाथ खडसेंच्या कालच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यावर मी न बोलण्याचा निर्णय घेतला होता. कारण ते काय म्हणाले हे मी प्रत्यक्षात ऐकले नव्हते. पण रात्री मी जेव्हा ऐकले तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली”. आज मी मुंबई मराठी पत्रकार संघात संध्याकाळी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ‘महाविकास आघाडीचे घोटाळे बाहेर येतील, म्हणून सीबीआयला प्रवेश बंदी’
- शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा होणार खंडित !
- शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुश्रीफ आज नगर दौऱ्यावर; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा
- ‘खडसे ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी चांगले काम करावे यासाठी त्यांना शुभेच्छा’
- ‘महाराष्ट्र सरकार’चा CBIला जोरदार धक्का; घेतला ‘हा’ खूप मोठा निर्णय


