मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली त्याच सोबत राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीमुळे देशातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. भाजप विरोधी धोरण आखले जाणार अशी शक्यत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होती अखेर ती शक्यता खरी ठरली आहे. २०२४ च्या निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. बैठकीनंतर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपाला देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यासाठीच ममता बॅनर्जी यांनी आमची भेट घेतल्याचं देखील शरद पवार म्हणाले. सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४ च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय उपलब्ध व्हायला हवा. यासाठीच त्यांनी आमची भेट घेतली आहे. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे, असं शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचं, त्यामुळे महाराष्ट्र अडचणीत’
- ममता बॅनर्जी म्हणाल्या, सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर…
- पुण्यात चिंतेचं वातावरण! नायजेरियातून आलेले 2 नागरिक करोना पॉझिटिव्ह
- रशीद खानने सनरायझर्स हैदराबाद संघाला का दिला डच्चू? कारण आले समोर
- अजिंक्य रहाणेला मुंबई कसोटीतून वगळणे फायद्याचे; दिनेश कार्तिकचे परखड मत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

