Share

‘महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचं, त्यामुळे महाराष्ट्र अडचणीत’

Published On: 

नाशिक : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यादरम्यान, पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये विनायक मेटे यांन महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. कोरोनाचं (Corona) संकट असेल किंवा अवकाळी पाऊस असेल असे अनेक संकट या सरकारच्या काळात आले. हे सरकार पालथ्या पायाचं सरकार आहे. त्यामुळे राज्य अडचणीत आलं आहे, असा गंभीर आरोप विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर केला आहे.

सरकार आणि विमा कंपन्यांचं साटंलोटं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाहीत. राज्य सरकार ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची वीज तोडत आहे. सभागृहात एक बोलायचं आणि प्रत्यक्षात वेगळं वागायचं, असा विश्वासघात सरकार करत आलं आहे. विश्वासघात हा ठाकरे सरकारचा स्थायीभाव आहे. प्रत्येक घटकांचा या सरकारने विश्वासघात केला. या सरकारला शिवाजी महाराज स्मारकासाठी 2 वर्षात 2 मिनिटंदेखील यासाठी वेळ देता आलेला नाही. मंत्री अशोक चव्हाण तोंड बंद करुन बसले, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे.

साहित्य संमेलनाचा इतिहास खूप मोठा आहे. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना प्रेक्षकांमध्ये बसले होते. राजकारण होऊ नये म्हणून अलीकडच्या काळात साहित्य संमेलनात राजकारण वाढलं आहे. पालकमंत्री छगन भुजबळ स्वागत अध्यक्ष झाल्याने असं होणारच होतं. तुम्हाला पालकमंत्री पावभाजी खायला थोडी केले आहे, असं विनायक मेटे म्हणाले आहेत. विनायक मेटेंनी नाशिकमध्ये 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजनाच्या वादांवर ही प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!