Share

अजिंक्य रहाणेला मुंबई कसोटीतून वगळणे फायद्याचे; दिनेश कार्तिकचे परखड मत

Published On: 

🕒 1 min read

कानपूर : मुंबई कसोटी सामन्यावर यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आल्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ला वगळू नये, तर त्याच्या जागी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ला वगळण्यात यावे, असे त्याने म्हटले आहे. कार्तिकच्या मते, अय्यर फॉर्मात आहे आणि त्यामुळे त्याला वगळणे योग्य होणार नाही.

अजिंक्य रहाणेची कसोटी क्रिकेटमध्ये यंदाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. त्याने 2021 मध्ये 19.6 च्या सरासरीने फक्त धावा केल्या आहेत. कानपूर कसोटी सामन्यात त्याने न्यूझीलंडविरुद्ध 35 आणि चार धावा केल्या होत्या. त्यामुळे रहाणेला वगळले तर ते संघाच्या हिताचे ठरेल, असे कार्तिकचे मत आहे.

श्रेयस अय्यरने धावा केल्यामुळे रहाणेवर दबाव असेल : दिनेश कार्तिक

क्रिकबझसोबतच्या संभाषणात दिनेश कार्तिक म्हणाला, ‘श्रेयस अय्यरने संघात येऊन चांगली कामगिरी केली आहे आणि म्हणूनच मला वाटते की रहाणेवर दबाव नक्कीच असेल. कदाचित रहाणेलाही वगळले जावू शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही असाच प्रकार घडला होता जेव्हा रहाणेला वगळण्यात आले होते. जर रहाणेला एका सामन्यासाठी वगळले तर त्यात काहीही नुकसान नाही.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी सामना रोमहर्षक अनिर्णित राहिला. या सामन्यात श्रेयस अय्यरने भारताकडून फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली. पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावून त्याने इतिहास रचला. दुसरीकडे रहाणेबद्दल बोलायचे झाले तर त्याची कामगिरी सातत्याने खराब राहिली आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या आगमनानंतर कोणाला वगळले जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!