Share

पुण्यात चिंतेचं वातावरण! नायजेरियातून आलेले 2 नागरिक करोना पॉझिटिव्ह

Published On: 

पुणे : करोनाच्या नव्या व्हेरिएंटला तोंड देण्यासाठी राज्य सरकारसह सर्वच महापालिका सज्ज झाल्या असल्या तरी या विषाणूची धास्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. परदेशातून परतलेले प्रवासी आणि करोना पॉझिटिव्ह निघालेले नागरिक यामुळे हा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दक्षिण आफ्रिका या देशातून पुणे जिल्ह्यात परतलेले तिन्ही नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील दोघे पिंपरी-चिंचवड येथिल आहेत. त्यामुळं जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातच चिंतेचे वातावरण आहे. तत्पूर्वी कोरोनाचा भारतामध्ये शिरकाव होताना पहिला रुग्ण पुण्यातच सापडला होता.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओमिक्रॉनचा संसर्ग पसरला आहे. जगातील 15 देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आता भारतातही केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने ओमिक्रॉन विषाणूला अटकाव करण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात देखील केली आहे.

परदेशातून आलेल्या लोकांची आर.टी.पी.सी.आर. टेस्ट करण्यात येत आहे आणि प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्यास जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्याची पुढील लॅब टेस्ट करण्यात येत आहे. याच तपासणी प्रक्रियेमुळं नायजेरियातून पिंपरी चिंचवाडमध्ये आलेले दोन नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे त्यांच्या चाचणी अहवालातून समोर आले आहे. आता पुण्यातील एन.आय.व्ही. येथे त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा संपूर्ण राज्यानेच सतर्क राहणे अत्यंत महत्वाचे असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतून 15 दिवसांपूर्वी पुण्यात आलेली एक व्यक्ती देखील करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की कसे, याची खातरजमा करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यातच आत आणखी दोघे पॉझिटिव्ह आढळ्यानं पुणेकरांची चिंता वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!