🕒 1 min read
मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली त्याच सोबत राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीमुळे देशातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहेत.
ममता बॅनर्जी सतत देशभरात दौरे करत आहेत आणि बिगर काँग्रेस विरोधी पक्षांच्या भेटी घेऊन स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्रिपुरा निवडणुकीत भाजपाच्या हातून तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या बाहेर विस्तार करण्याची तयारी सुरु केली आहे. मला भाजपाला या देशातून राजकीयदृष्ट्या बाहेर पाहायचे आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मुंबईत सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांशी संवाद साधताना त्यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची योजनाही सांगितली. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे सोपे जाईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. आगामी काळात आणखी काही प्रादेशिक पक्ष जोडण्याचा त्यांचा डाव असल्याचे स्पष्ट संकेत ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- पुण्यात चिंतेचं वातावरण! नायजेरियातून आलेले 2 नागरिक करोना पॉझिटिव्ह
- रशीद खानने सनरायझर्स हैदराबाद संघाला का दिला डच्चू? कारण आले समोर
- ‘वीज फुकट तयार होत नाही, भाजपने शेतकऱ्यांना सवय लावून ठेवली आहे’
- अजिंक्य रहाणेला मुंबई कसोटीतून वगळणे फायद्याचे; दिनेश कार्तिकचे परखड मत
- ‘आम्ही भाजपला पुरुन उरलो, महाराष्ट्रही सरकारी दहशतवाद्यांचा…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
