नवी दिल्ली : अफगाणिस्तानचा दिग्गज लेगस्पिनर राशिद खान (Rashid Khan) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघातून रिलीज झाल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राशिद खान (Rashid Khan) ला लिलावात जायचे होते आणि म्हणूनच फ्रँचायझीकडून त्याला वगळण्यात आले. संघातून मुक्त झाल्यानंतर त्याने एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली आहे. राशिद खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चार फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.
राशिद खान इंस्टाग्रा पोस्ट :
राशिद खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, ‘सनरायझर्स हैदराबादसोबतचा प्रवास खूप छान होता. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम आणि विश्वास दाखवला. ऑरेंज आर्मी नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिली आहे आणि यासाठी मी नेहमीच आभारी राहीन. सर्व चाहत्यांचे मी आभारी राहीन.’
https://www.instagram.com/p/CW7NXiZF4X5/?utm_source=ig_web_copy_link
जर आपण राशिद खानबद्दल बोललो तर 2017 पासून तो राजस्थान रॉयल्स संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याची आयपीएलमधील आकडेवारी जबरदस्त आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमधील 76 सामन्यांत 6.33 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने 93 बळी घेतले आहेत.
सनरायझर्स हैदराबादने स्टार स्पोर्ट्सवर कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करताना फ्रँचायझीच्या सीईओने राशिद खानबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘राशिद खान संघाच्या योजनांचा एक भाग होता परंतु स्वतः रशीदला लिलावात जायचे होते. त्याच्या निर्णयाचा आदर केला गेला. आणि त्याला संघातून रिलीज करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- ‘एक तालुका, एक शहर सांभाळता येत नाही अन् म्हणे पंतप्रधान पदाचे दावेदार’
- ‘आमचा कोणताही घोटाळा बाहेर काढून दाखवावा, त्यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही’
- ‘चैत्यभूमीवर यंदाही प्रवेश बंदी केली, दुतोंडी खंडणी सरकारचा जाहीर निषेध’
- ‘उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांच काय?’
- ममता बॅनर्जी-शरद पवार यांची आज भेट; तृणमूल महाराष्ट्र भाजपाला देणार आव्हान?

